विनय खरंच एक ‘अजब’ रसायन आहे! काय म्हणू, वल्ली, अवलिया, बंडखोर, परखड, उनाड...?
विनयच्या आई अतिशय स्पष्टवक्त्या, निर्भीड व परखड होत्या. अजिबात भिडस्तपणा नाही, मात्र त्यातून कोणालाही दुखावणं किंवा कमी लेखणं कधीच नसायचं. विनयमध्ये नेमके हेच गुण रुजले आहेत. माझ्या मते विनयचा स्पष्टवक्तेपणा, निर्भीडपणा, परखडपणा ही त्याच्या आईची देण आहे. विनय, मी आणि इतर सर्व विद्यार्थ्यांचे इंग्रजीमधील प्रावीण्य याचं श्रेय शाळेचे मुख्याध्यापक श्री. ह. पु. पायगावकर सर यांना जातं.......